0
नंदूरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा व परिसरातील जलयुक्त शिवार अभियान, वनराई बंधाऱ्यासह भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या कामांची पाहणी केली.

यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. हीना गावीत, सर्वश्री आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जयकुमार रावल, शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे, उपविभागीय अधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भूजल सर्वेक्षण विभागाकडील पुनर्भरण चर, रिचार्ज शॉफ्ट जलयुक्त काम, लघुपाटबंधारे विभागाकडील सिमेंट नाला बांधकाम, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेले विहीर पुनर्भरणाचे काम, धुळे पाटबंधारे विभागाकडील तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. ठाणेपाडा येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट या कामावर 11.81 लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. त्यातून 7 टीसीएम जलसाठा निर्माण झाला आहे. तसेच 700 घनमीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post

Post a Comment

 
Top