0
 
"शासन आपल्या दारी" या महायुती शासनाच्या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्य मंत्री प्रा. राम शिंदे यांनी 14 मे रोजी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारास भरभरुन प्रतिसाद मिळाला. विविध खात्याबद्दल असलेल्या जवळपास 140 तक्रारदारांच्या तक्रारी मा. पालकमंत्र्यांनी स्वत: जाणून घेत त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.तक्रारदारांचा प्रतिसाद पाहता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार घेता जाईल असे पालकमंत्र्यांनी जाहिर केले.
सकाळी 11 वाजता सुरु झालेला जनता दरबार दोन तास सुरु होता. महसुल, गृह, सार्वजनिक बांधकाम, जिल्हापरिषद, पाणीपुरवठा, महनगरपालिका या खात्यांसंदर्भात नागरीकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. प्रत्येक तक्रारदाराबरोबर पालकमंत्र्यांनी स्वत: चर्चा करुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने जाणून घेतले. या दरबारात आलेले तक्रारदारांचे अर्ज वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहेत. लोकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन ते सुटावेत यासाठी जनता दरबार घेतला आहे असे यावेळी प्रा. राम शिंदे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. अनिल कवडे, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे, अतिरीक्त जिल्हाधिकारी श्री. शरद जाधव, महापालिकेचे आयुक्त श्री विजय कुलकर्णी , निवासी जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र पाटील, जिल्हा कृषि अधिकारी श्री. अंकुश माने यांच्या सह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थितीत होते

Post a Comment

 
Top